PMC : प्रामाणिक करदात्यांना आयुक्तांनी विश्वास दिला – उज्ज्वल केसकर

एमपीसी न्यूज – पुण्यातील प्रामाणिक (PMC) करदात्यांना आयुक्तांनी विश्वास दिला आहे, अशी प्रतिक्रिया महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते उज्ज्वल केसकर, सुहास कुलकर्णी आणि माजी नगरसेवक प्रशांत बधे यांनी दिली.

पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पुणे शहरातील कर बुडव्या लोकांना लोक अदालतमध्ये व्याज आणि दंड माफ करण्यासंबंधी खात्याने दिलेला प्रस्ताव कायदेशीर कारणासाठी नाकारून एक प्रकारचा संदेश दिला. त्याबद्दल विधि विभागाच्या प्रमुखांचे देखील मनापासून अभिनंदन करण्यात आले. त्यांनी मुलाहिजा न बाळगता स्पष्ट कायदेशीर अभिप्राय दिला.

कर आकारणी आणि कर संकलन विभागाला इतकी काय घाई होती आणि गरज होती की या habitual defaulter tax payer यांना सवलत देण्याची? पुन्हा एकदा महानगरपालिका आयुक्तांचे मनःपूर्वक धन्यवाद आणि अभिनंदन त्यांनी आमची मागणी (PMC) मान्य केली आणि पुण्यातील प्रामाणिक करदात्यांना विश्वास दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.