PMPML : बस चालक मद्यधुंद अवस्थेत, प्रवाशांचे प्राण धोक्यात; दोन तरुणांनी वाचवला प्रवाशांचा जीव

एमपीसी न्यूज : प्रवाशांसोबतचे पीएमपीएमएल (PMPML) चालक-वाहकांच्या गैरवागणुकीमध्ये वाढ होत चालली आहे. प्रवासी हा चालकावर विश्वास ठेऊन आपला पुढचा प्रवास करत असतो. परंतु, जर तो चालकच आपल्याला मृत्यूच्या वाटेवर नेत असेल तर? खाजगी वाहनांच्या वाढत्या अपघाताने लोकांनी सार्वजनिक वाहनांचा रस्ता पकडला आहे. परंतु, हा रस्ता देखील मृत्यूच्या दिशेने घेऊन जातोय का? अशी भीती लोकांमध्ये निर्माण होत आहे. त्याचे कारण म्हणजे पुण्यात पीएमपीएमएल बस चालकाने मद्यधुंद अवस्थेत चालवलेली गाडी.

सविस्तर माहिती अशी, की पुणे स्टेशन डेपोमधील पीएमपीएमएल बस चालकाने मद्यधुंद अवस्थेत बस काळेपडळ परिसरात आणली. फराटे चौकाजवळील रेल्वे क्रॉसिंगजवळ येऊन त्याने रस्त्याच्या विरुद्ध दिशेने बस नेली.

बसचालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे समजताच बसमधीलच गणेश काळसाईत, मयूर बोराडे या दोन तरुणांनी प्रसंगावधान राखत स्टीयरिंग ताब्यात घेत गाडी थांबवली. या बसमध्ये दहा ते बारा जण प्रवास करत होते. परंतु, दोन तरुणांनी प्रसंगावधान दाखवल्याने मोठा अनर्थ टळला.

हा सर्व प्रकार घडल्यानंतर बसमधील नागरिक आणि शिवसेनेचे नितीन गावडे (PMPML) यांनी तात्काळ डेपो मॅनेजरशी संपर्क केला. परंतु, ही बस कंत्राट पद्धतीची असल्याने चालकविषयी माहिती नसल्याचे त्यांना सांगण्यात आले. यामुळे पुन्हा एकदा पीएमपीएमएलचा बेजबाबदार कारभार समोर आला आहे.

 Pune : ‘एमपीसी न्यूज’च्या राजकीय सल्लागार संपादकपदी गोविंद घोळवे यांची नियुक्ती

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.