PMPML BUS : सिंहगडावरची ई बस सेवा 17 पासून तात्पुरत्या स्वरुपात बंद

एमपीसी न्यूज – सिंहगड किल्ल्यावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने पीएमपीएलने ई बस सेवा सुरू केली होती.या बस सेवेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते एक मे रोजी करण्यात आले होते.मात्र ही बस सेवा 17 मेपासून तात्पुरत्या कालावधीकरीता बंद करण्यात येत आहे, असे पीएमपीएलच्यावतीने कळविण्यात आले आहे.

 

सिंहगडावर दोन मेपासून प्रायोगिक तत्वावर सिंहगडावरची खासगी वाहने बंद करुन ई बस वाहतूक सुरू केली होती.त्याला पर्यटकांचा चांगला प्रतिसाद मिऴत होता.परंतू प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता ई बसची संख्या अपुरी पडत आहे. त्याशिवाय सिंहगड वाहनतऴावर चार्जिंग स्टेशन उभारण्यात आले होते.

 

दोन मेपासून प्रायोगिक तत्वावर सुरू असलेली ई बस सेवा अरुंद रस्ते, जागेवरचे अवघड वळण,चढता घाट,तीव्र उतार यामध्ये चार्जिंग मोठ्या प्रमाणात खर्ची पडते.त्यामुळे बसेसची संख्या व चार्जिंग पाईंटची संख्या वाढविणे वाढविणे आवश्यक आहे.रस्ता रुंदीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रवास सुखकर होईल.

 

ई बस सेवा सुरु झाल्यापासून झालेला किरकोळ अपघाताचा विचार करता नवीन लहान आकाराच्या ई बसची आवश्यकता आहे.त्यामुळे नवीन लहान बसेस येईपर्यत 17 मेपासून तात्पुरत्या स्वरुपात ही बस सेवा स्थगित करण्यात येत आहे,असे पीएमपीने कळविले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.