Pimpri Chinchwad : पोलीस अधिकाऱ्याच्या मुलाने रोवला पिंपरी-चिंचवडकरांच्या शिरपेचात तुरा

एमपीसी न्यूज : जे आडात असते तेच पोहऱ्यात येते…या म्हणीनुसार बाबांच्या (Pimpri Chinchwad) पावलावर पाऊल टाकत अवघ्या सातव्या वर्षी मेहनत व कष्टाच्या जोरावर रिआन देवेंद्र चव्हाण याने सायकलवरून सलग 51 किमीचा प्रवास करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदवला आहे.

 

रिआन याचे बाबा देवेंद्र चव्हाण हे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग प्रमुख या पदावर तर आई डॉ. अपर्णा ह्या भारतीय प्राणी सर्वेक्षण, पश्चिमी प्रादेशिक केंद्र पुणे येथे शास्त्रज्ञ-ई पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या संस्कारात वाढलेल्या रिआनने त्याच्या 7 व्या वाढदिवशी हा पराक्रम केला. ज्याची आता इंडिया बुक ऑफ रेकॉर्डनेही नोंद घेतली आहे.

पोलीस दल म्हणजे प्रचंड शारीरिक मेहनत व ताण असतो. त्यातून हसतमुखाने नोकरी कऱणे व कुटुंबाकडे लक्ष देणे ही त्यांच्यासाठी तारेवरची कसरत असते. चव्हाण यांनी हि कसरत उत्तमरित्या पेलत आपल्या मुलाला अवघ्या तिसऱ्या (Pimpri Chinchwad) वर्षापासून मेहनतीचे धडे दिले. त्यामुळे रिआनने 12 फेब्रुवारी रोजी त्याच्या वाढदिवशी सायकलवर पुणे दर्शन सी.एम.ई., खडकी, लाल महाल, शनिवार वाडा, दगडूशेठ गणपती, डेक्कन, औंध, निगडी असा एकूण 51 किमी. चा प्रवास त्याने सायकलवरून केला आहे.

Chinchwad News : दुचाकीवरून जगभ्रमंती करणाऱ्या चिंचवडच्या रमाबाईने घेतली पंतप्रधानांची भेट

याविषयी बोलताना देवेंद्र चव्हाण म्हणाले की, रिआनचे लहानपणापासून साहसी खेळाकडे कल झुकलेला आहे. अवघ्या 3 वर्षाचा असताना सिंहगड ट्रेक पूर्ण केला. त्यानंतर तिकोना, विसापूर, लोहगड, शिवनेरी, तोरणा, सरसगड, मोहनदरी असे किल्ले व नेहमीच मनात येईल तेव्हा घराजवळचे घोराडेश्वर, चौराई माता डोंगर, डोंगरवाडी, फिरंगाई माता मंदिर, दुर्गा टेकडी टेक करत असतो.

रनिंगमध्ये 6 मॅरेथॉन 5 किमीच्या त्याने पूर्ण केलेल्या आहेत पिंपरी चिंचवड येथील 5 किमी. मॅरेथॉन 34 मिनिटात पूर्ण केलेली आहे. स्पोर्ट्स फोर ऑल 2022 या अंडर 8 वर्षे वयोगटात 50 मीटर रनिंगमध्ये 3 रा नंबर पटकावून ब्रांच मेडल मिळवलेले आहे. तो केंद्रीय विद्यालय देहूरोड नंबर-1 या शाळेत दुसरी येतेत शिकत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.