Pune: मोदींनीच कोरोना आणला म्हटलं तर चुकलं कुठे ? अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

prakash ambedkar slams on pm narendra modi for corona in inida कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक वैतागला आहे. त्यांना दिलासा देण्याची गरज आहे.

एमपीसी न्यूज – परदेशातून येणाऱ्या लोकांना रोखण्याची, त्यांची कोरोना टेस्टिंग करण्याची गरज होती. त्यावेळी मोदींनी डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या लवाजम्याला बोलावून स्वतःचा राजकीय हेतू साध्य करण्याचा प्रयत्न केला, असे असताना मोदींनीच भारतात कोरोना आणला म्हटलं तर चुकलं कुठे? असा संतप्त सवाल वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विटरवर वरून उपस्थित केला आहे.

संपूर्ण देशात कोरोनाचे संकट निर्माण झाले आहे. त्यावरून आंबेडकर यांनी मोदी यांना टार्गेट केले आहे. तसेच, राज्यात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लागू केलेल्या लॉकडाऊनलाही विरोध केला आहे.


औरंगाबाद दौऱ्यावर असताना आंबेडकर यांनी सर्वसामान्य माणसाने आपले व्यवसाय सुरू करण्याचे आवाहन केले होते. मुख्यमंत्री ठाकरे यांनी अर्थव्यवस्था सांभाळण्याचे आवाहनही त्यांनी केले होते.

आता त्यांनी मोदी यांना टार्गेट केल्याने खमंग चर्चांना उत आला आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेला खीळ बसली असून ती सावरण्याची जबाबदारी शासनाची आहे. लोकांना वाचवण्यासाठी जनजीवन सुरू करावे, असेही आंबेडकर यांनी निक्षून सांगितले आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य नागरिक वैतागला आहे. त्यांना दिलासा देण्याची गरज आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे या दोघांनाही आंबेडकर यांनी धारेवर धरले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.