Prime Minister Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात येण्यापेक्षा मणिपूरमध्ये गेले पाहिजे – रवींद्र धंगेकर 

     काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्यासह अन्य संघटनांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौर्‍याला विरोध; मंडई चौकात आंदोलन सुरू 

एमपीसी न्यूज –  पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे दौर्‍यावर (Prime Minister Narendra Modi) येत आहे. 11 वाजता ते श्रीमंत दगडूशेठ गणपती मंदिरात दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. त्यानंतर 11.45 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्यानंतर दुपारी 12:45 वाजता त्यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे उदघाटन केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या यांच्या दौर्‍याला पुणे शहरातील काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस यासह अन्य संघटनाच्या प्रतिनिधी यांनी विरोध दर्शविला असून त्याविरुद्ध मंडई चौकात आंदोलन करण्यात येत आहे.

Samruddhi Highway Accident : समृद्धी महामार्गावर शहापूरजवळ गर्डरसह क्रेन कोसळून भीषण अपघात;16 मजुरांचा मृत्यू

याविषयी बोलताना आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज पुणे शहरात कार्यक्रमासाठी येत आहे. पण मागील तीन महिन्यापासून मणिपूर राज्य जळत आहे. तेथील महिलांवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहे.

त्यावर आजपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्याही प्रकारची भूमिका मांडली नाही किंवा त्या ठिकाणी गेले नाही, तर ते देशातील अनेक भागात उद्घाटनाच्या कार्यक्रमाला जात आहे. ही निषेधार्थ बाब असून पंतप्रधान मोदी यांनी पुण्यातील कार्यक्रमाला येण्यापेक्षा मणिपूर येथे जाऊन जनतेला न्याय देण्याच काम करावे, अशी मागणी त्यांनी केली.

तसेच ते  म्हणाले, भाजपकडून आम्हाला जशास तसे उत्तर देण्याची भाषा केली आहे. आम्हाला दगड मारल्यास आम्ही ते दगड खाऊ ,अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.

लोकमान्य टिळक पुरस्कार सोहळ्यास शरद पवार यांनी जाऊ नये, अशी विनंती काँग्रेस पक्षातील नेत्यांनी केली आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार हे देशाचे ज्येष्ठ नेते आहे. शरद पवार यांना मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणावर असून अनेकांना पडत्या काळात शरद पवार यांनी साथ दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुजरात राज्याचे मुख्यमंत्री होते.त्यावेळी शरद पवार यांनी मदत केली होती. नरेंद्र मोदी यांना पुरस्कार दिल्यानंतर त्यांच्या डोक्यात प्रकाश पडेल या भावनेतून शरद पवार पुरस्कार सोहळ्यास जात आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर धंगेकर यांनी टीका (Prime Minister Narendra Modi) केली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.