Dehu : भंडारा डोंगराजवळ खाजगी वाहनाचा अपघात; 14 वारकरी महिला जखमी

एमपीसी न्यूज – देहू गावाजवळ भंडारा डोंगर येथे एका खाजगी वाहनाला अपघात झाला. यामध्ये 14 वारकरी महिला जखमी झाल्या. हा अपघात आज (शुक्रवारी) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास झाला. 

उषा तावडे (वय 41),रुक्मिनी कातडकर(वय 50),समिंद्ररा बाई गिरणारे (वय 55), शोभा नरवडे(वय 40), रासकरबाई अंबोरे (वय 39), कौसरबाई गिरणारे (वय 60), शोभा पैठणकर(वय समजू शकले नाही) या सर्व महिला गंभीर जखमी झाल्या असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठविण्यात आले असल्याची माहिती देहूगाव प्राथमिक आरोग्य केद्रांचे वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर यादव यांनी दिली. तर लिलाबाई अंबोरे(वय 45),मनताबाई इंगळे(वय 40), गोदावरी अंबोरे(वय 45),शकुंतला केवट(वय 55), शारदाबाई गिगणारे(वय 30) सर्व जखमी महिला या जालना जिल्ह्यातील आहेत. या किरकोर जखीम झाल्याने त्यांना देहू येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार देऊन सोडण्यात आल्याचे डॉ.यादव यांनी सांगितले. 

 
जखमींनी प्रत्यक्ष दिलेल्या माहितीनुसार या सर्व महिला पालखी आकुर्डीकडे मार्गस्थ झाल्यानंतर येथूनच जवळ असलेल्या भंडारा डोंगरावर श्री संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेण्यासाठी गेल्या होत्या. दर्शन घेऊन परत येत असतना अॅपे टेम्पो चालकाचा एका वळणार ताबा सुटला आणि अॅपे टेम्पो बाजूच्या कठड्यावर धडकला. यात आठ महिला गंभीर जखमी झाल्या व पाच महिला किरकोळ जखमी झाल्या. या सर्व जखमी महिलांना दुसऱ्या एका वाहनात घालून तातडीने देहूगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. या जखमींपैकी आठ महिला गंभीर जखमी होत्या. त्यांच्यावर तातडीने प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात पाठविण्यात आले. तर उर्वरित पाच महिलांवर येथेच उपचार करून सोडण्यात आले. जर हा टेम्पो खाली कोसळला असता तर मात्र मोठी जिवीत हानी झाली असती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.