Nigdi : महंमद पैगंबर जयंतीनिमित्त जुलूस

एमपीसी न्यूज – अ आणि फ जुलूस कमिटीच्या वतीने निगडी परिसरात इद ए मिलादुन्नबी (महमंद पैगंबर जयंती) मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी पोलीस निरीक्षक राजेंद्र निकाळजे, नगरसेवक सचिन चिखले, पंकज भालेकर, सामाजिक कार्यकर्ते भाईजान काझी, बापू घोलप, झीशान सय्यद, अ आणि फ जुलूस कमिटीचे अध्यक्ष आलम(बाबा)शेख, सचिव फिरोज सय्यद, उपाध्यक्ष मकबूल शेख आदी उपस्थित होते.

निगडी जकात नाक्याजवळ निगडी, तळवडे, आकुर्डी, रुपीनगर, चिंचवड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत या परिसरातील या सुमारे १३ मंडळाचे (तंजिम) कार्यकर्ते जमा झाले होते. या ठिकाणी मौलाना फैज अहमद फैजी यांनी पैगंबर यांच्या जीवनावर प्रवचन दिले. तसेच नात व कुराण पठण केले. भाविकांना महाप्रसाद देण्यात आला. कै. मधुकर पवळे प्रतिष्ठानतर्फे जलसेवा तर शेख बाबा मदरसातर्फे खाऊ वाटप करण्यात आले.

या प्रसंगी मौलाना गुलाम रसूल, मौ. जकिरुद्दिन, मौ.अब्दुल्ला तसेच मस्जिदचे प्रमुख नासिर शेख, अब्दुल आत्तार, सुलतान तांबोळी, अफजल पठाण, आफताब शेख, मोइन शेख, इस्माईल खान आदी उपस्थित होते. निगडी जकात नाक्यापासून महामार्गाने पिंपरी चौक या दरम्यान महोम्मद पैगंबर यांच्या मंदिराच्या प्रतिकृतीची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.