Pune : चोवीस तासांत विलगीकरणाचे 300 बेड्स सज्ज -मुरलीधर मोहोळ

शहरात तीन ठिकाणी विलगीकरण केंद्र

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेचा आरोग्य विभाग ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सज्ज झाला असून अवघ्या चोवीस तासांच्या आताच विलगीकरणाचे 300 बेड्स सज्ज करण्यात आले आहेत, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर नायाडू सांसर्गिक रुग्णालयात सुरुवातीला विलगीकरणाचे सहा बेड्स उपलब्ध करण्यात आले होते. मात्र, दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आरोग्य विभागाने युद्धपातळीवर काम करत ३०० बेड्सची व्यवस्था केली आहे.

यावेळी महापौर म्हणाले, ‘आरोग्य विभागाने केलेल्या तयारीचा आज पुन्हा एकदा सविस्तर आढावा घेतला असून शहराच्या विविध भागांत तीन ठिकाणी ३०० विलगीकरण बेड्स सज्ज केले आहेत.

महापालिकेने पूर्ण क्षमतेने तयारी केलेली असून यासाठी सर्व पातळ्यांवर सर्वच घटकांचे सहकार्य घेतले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता स्वतःची जबाबदारीने काळजी घ्यायला हवी’.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.