Pune : 400 आयटी, बीपीओ कर्मचारी बडतर्फ ; ‘लॉकडाऊन’चे उल्लंघन केल्याबद्दल ‘एनआयटीईएस’ युनियनची जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव

एमपीसी न्यूज – आयटी, आयटीएस, बीपीओ, केपीओ कंपन्यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि साथीच्या कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन  करीत सुमारे 400 कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकल्यामुळे एनआयटीईएसने आता पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे धाव घेतली आहे.

राष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कर्मचारी सेना (एनआयटीईएस) आयटी, आयटीईएस आणि संबंधित क्षेत्रातील कर्मचार्‍यांच्या कल्याणासाठी आणि हितासाठी काम करीत आहे. एनआयटीईएसचे अध्यक्ष रघुनाथ कुचिक यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, विविध आयटी, आयटीएस, बीपीओ, केपीओच्या कर्मचार्‍यांकडून अनेक तक्रारी आल्या आहेत. लॉकडाउन कालावधी दरम्यान बऱ्याच कंपन्यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. यामध्ये कॅपजेमिनी सारख्या कंपन्या कर्मचार्‍यांना तातडीने राजिनामा देण्यास भाग पाडत आहेत. तसेच सिस्टम प्लस, मगरपट्टा आणि अॅमडॉक्स बीपीओ विक्रेते क्वेश कॉर्प, एजस्ट, एचसीएल बीपीओ आणि कोलबेरा यासारख्या अनेक कंपन्यांचा यामध्ये समावेश आहे. ज्यांनी 400 हून अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकले आहे. यामुळे महाराष्ट्रातील 5.5 लाखाहून अधिक आयटी, आयटीएस, बीपीओ, केपीओ कर्मचार्‍यांचे वेतन आणि नोकरी धोक्यात आहे.

लॉकडाऊनच्या काळात जेव्हा केंद्र व राज्य सरकार कर्मचार्‍यांच्या रोजगाराची व पगाराचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करीत आहे. तर विविध आयटी, आयटीएस, बीपीओ, केपीओ कंपन्यांच्या व्यवस्थापनाने कायदेशीर तरतुदींच्या पूर्णपणे विरोधात आणि बेकायदेशीरपणे कार्य केले आहे . त्यामुळे विविध आयटी, आयटीएस, बीपीओ, केपीओ कंपन्यांनी कर्मचाऱ्यांचे वेतन कमी न करण्याचे व त्यांना कामावरून तडकाफडकी न करण्याची आदेश देण्यात यावे, अशी मागणी कुचिक यांनी केली आहे.

एनआयटीईएसचे सरचिटणीस हरप्रीतसिंग सलुजा म्हणाले, आम्ही यापूर्वी कामगार उपायुक्त कार्यालयाकडे तक्रार केली. त्याची दाखल घेत कामगार उपायुक्त कार्यालयाने संबंधित आयटी या कंपन्यांना यासंदर्भात नोटिसा बजावल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.