Pune : 64 वर्षाचा ज्येष्ठ नागरिक सेक्सटॉर्शनच्या जाळ्यात; वाचा काय झाले

एमपीसी न्यूज : न्यूड व्हिडिओ कॉल करून एका 64 वर्षीय नागरिकाला (Pune) न्यूड होण्यास भाग पाडले. त्यानंतर तो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन आणि पोलीस असल्याची बतावणी करून चार लाख 66 हजार रुपयांनी फसवणूक करण्यात आली. पुण्यातील चतु:शृंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा सर्व प्रकार घडला. याप्रकरणी अज्ञात मोबाईल धारका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी हे त्यांच्या घरी असताना अज्ञात नंबरवरून त्यांना व्हाट्सअप वरून व्हिडिओ कॉल आला. त्यांना अश्लील व्हिडिओ दाखव नग्न होण्यास भाग पाडले. त्यानंतर हा व्हिडिओ कॉल रेकॉर्ड करून व्हायरल करण्याची धमकी दिली.

हा व्हिडिओ युट्युबवर टाकून तो डिलीट (Pune) करण्यासाठी चार लाख 66 हजार रुपये फिर्यादी यांच्याकडून घेतले. दरम्यान आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर फिर्यादी यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Talegaon Dabhade : कॉमर्स फेस्टिवलमध्ये उद्योग क्षेत्रात मनुष्यबळ विभागाची भूमिका विषयावर व्याख्यान

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.