Pune Accident News : हडपसरमध्ये कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

एमपीसीन्यूज : भरधाव कंटेनरचालकाने बेदरकारपणे वाहन चालवून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाला. हा अपघात काल सकाळी साडेअकराच्या सुमारास हडपसर सिग्नलजवळ घडला.

लक्ष्मण सिद्धप्पा बाके (वय 48, रा. हडपसर ) असे ठार झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अन्नपुर्णा बाके (वय 41) यांनी हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

काल सकाळी सव्वा अकराच्या सुमारास लक्ष्मण दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनरचालकाने त्यांना धडक दिली. त्यामुळे खाली पडल्यामुळे लक्ष्मण गंभीररित्या जखमी झाल्यामुळे ठार झाले.

याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक थोरात तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.