Pune Crime News : शहरात घरफोडीचे सत्र सुरूच, औंध, येरवडा, लोहगावमध्ये घरफोडी

एमपीसी न्यूज – शहरातील विविध भागात चोरट्यांकडून घरफोडीचे सत्र कायम असल्याचे दिसून आले आहे. चोरट्यांनी औंधमधील पुष्पक पार्क सोसायटी, येरवड्यातील लक्ष्मीनगर आणि विमानतळमधील अंबिकानगरमध्ये घरफोडी करून लाखोंचा ऐवज चोरून नेला आहे.

औंधमधील वसुमती सोसायटीतील एका ज्येष्ठ महिलेच्या घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी मोबाईल आणि रोकड असा मिळून 7 हजारांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी चतुःशृंगी पोलीस तपास करीत आहेत. दुसऱ्या घटनेत चोरट्यांनी येरवड्यातील लक्ष्मीनगरमधील घरातून तीन मोबाईल आणि चांदीचे ब्रेसलेट असा मिळून 37 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी महेश गवळी (वय 36) यांनी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून चोरट्यांनी सोन्याचे दागिने, लॅपटॉप, टीव्ही, गॅसशेगडी, असा मिळून 1 लाख 34 हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना दोन दिवसांपुर्वी सकाळी दहाच्या सुमारास लोहगावमधील दत्तनगरमध्ये घडली. याप्रकरणी शिवचंद्रा प्रसाद (वय 32) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक गांधले तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.