Pune Airport : पुणे विमानतळावरील प्रवाशांच्या संख्येत गेल्या वर्षी तब्बल 50 टक्के वाढ

एमपीसी न्यूज – पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून (Pune Airport) प्रवास करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या वर्षभरात या प्रवासी संख्येत तब्बल 50 टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. लोहगाव विमानतळावरून वर्षभरवात 45 लाखांपेक्षा अधिक प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 

पुण्याच्या लोहगाव विमानतळावरून (Pune Airport) वर्षभरात एकूण 45 लाख 141 प्रवाशांनी प्रवास केला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत प्रवाशांची संख्या 15 लाखांनी वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पुणे हे झपाट्याने आंतरराष्ट्रीय शहर म्हणून विकसित होत आहे. या पार्श्वभूमीवर शहरातून विमानप्रवास करणाऱ्यांची संख्याही वाढताना दिसत आहे.

Pune Fire : तुळशीबागेत ट्रान्सफॉर्मरला तर वानवडीत ज्वेलर्सच्या दुकानाला आग

पुणे विमानतळावरून दररोज 190 विमानांचे उड्डाण होते. देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली असल्याचे विमानतळ प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीवरून पाहायला मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.