Pune : ‘विद्यापीठ व्यवस्थापनातील माहिती तंत्रज्ञानाचे नवे प्रवाह’ विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेचे पुण्यात उदघाटन

एमपीसी न्यूज -‘असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’ आणि भारती अभिमत विद्यापीठाने संयुक्तपणे आयोजित केलेल्या’विद्यापीठांच्या व्यवस्थापनातील माहिती तंत्रज्ञानाचे नवे प्रवाह’ या विषयावरील 3 दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळेचे उदघाटन बुधवारी( दि.६) भारती अभिमत विद्यापीठाचेकुलगुरू आणि  असोसिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज’ चे अध्यक्ष डॉ माणिकराव साळुंखे यांच्या हस्ते करण्यात आले. 

‘इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट’आयएमईडी’ पौड रस्ता येथील कॅम्पसमध्ये ही कार्यशाळा झाली. विद्यापीठांचे देशभरातील 50 प्रतिनिधी या परिषदेत सहभागी झाले. उद्घाटन कार्यक्रमात संयोजक डॉ. अमरेंद्र पणी, डॉ एस एफ पाटील, आय एम ई डी चे संचालक डॉ. सचिन वेर्णेकर, डॉ. उषा राय नेगी, डॉ. सचिन कदम, डॉ श्याम शुक्ला, डॉ. स्वाती देसाई, डॉ श्रद्धा वेर्णेकर, डॉ. श्वेता जोगळेकर हे संयोजन समितीचे सदस्य यावेळी उपस्थित होते. 8 नोव्हेंबरला दुपारी 1 वाजता कार्यशाळेचा समारोप होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.