Pune : सावधान ! शहराच्या मध्यवर्ती भागांत कोरोना वाढतोय; भवानी पेठेत सर्वाधिक 214 रुग्ण

एमपीसी न्यूज – पुणे शहराच्या मध्यवर्ती भागांत कोरोनाचे संकट वाढत आहे. नव्हे या भागात कोरोनाने चांगलेच हातपाय पसरवले आहेत. एकट्या भावी पेठेत शहरातील सर्वाधिक 214 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामानाने औंध – बाणेरमध्ये 3 आणि कोथरूड – बावधनला फक्त एक रुग्ण आढळून आला आहे.

सध्या पुणे शहरात कोरोनाचा हॉटस्पॉट म्हणून भवानी पेठेची नवी ओळख निर्माण झाली आहे. सुरुवातीपासूनच येथे मोठ्यासंख्येने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. सध्या भवानी पेठेत 214, ढोले पाटील रोड 160, शिवजीनागर – घोलेरोड 133, कसबा – विश्रामबागवाडा 127, येरवडा – कळस – धानोरी परिसरात 119 कोरोनाचे रुग्ण असल्याची नोंद आहे. प्रशासनाने कडक अंमलबजावणी करूनही कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असल्याने प्रशासनाची आणि पुणेकरांची चिंता वाढत आहे.

शहराच्या मध्यवर्ती भागानंतर धनकवडी – सहकारनगर 55, वानवडी – रामटेकडी 54, बिबवेवाडी 31, हडपसर – मुंढवा 30, नगररोड – विश्रांतवाडी 29, कोंढवा – येवलेवाडी 13, सिंहगड रोड 10, वारजे – कर्वेनगर 9, औंध – बाणेर 3, कोथरूड – बावधन 1, पुण्याबाहेरील 49 असे 1075 कोरोनाचे रुग्ण असल्याची माहिती पुणे स्मार्ट सिटीतर्फे देण्यात आली. झोपडपट्ट्या, दाटीवाटीने असलेल्या भागांत कोरोना वाढत असल्याचे आकडेवारीनुसार दिसून येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिनांक 3 मे पर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. 40 दिवसांच्या या कालावधी दरम्यान सर्वसामान्य पुणेकरांचे प्रचंड हाल होत आहे. हातावरच पोट असणाऱ्या नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे आता काही प्रमाणात लोकडाऊन शिथिल करून गोरगरीब नागरिकांचा विचार करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.