Pune : खरा दोष भास्कर जाधव यांचा; उद्धव ठाकरे यांनी समज द्यावी – चंद्रशेखर बावनकुळे

एमपीसी न्यूज : भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी (Pune) माध्यमांसोबत संवाद साधताना प्रतिक्रिया दिली, की  मागच्या आठवड्यात भास्कर जाधव ज्या पद्धतीने वागलेत, चिथावणीखोर भाषणे केली आहेत; त्यामुळे खरा दोष भास्कर जाधव यांचा आहे. ज्या पद्धतीने व्यक्तिगत टीका टिपणणी करणे, व्यंग करणे या पद्धतीचे महाराष्ट्राचे संस्कार नाहीत. मी भाजपच्या रॅलीमध्ये हल्ला झाला, दगडफेक झाली आहे ती बघावी लागेल. पण याची सुरुवात मात्र भास्कर जाधव यांनी केली. 

लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर अशा घटना होणे योग्य नाही त्याची सुरुवात भास्कर जाधव यांनी आज केली. प्रथमदर्शनी भास्कर जाधव बोलल्यामुळेच हा सगळा गोंधळ झाल्याचा दिसून येत आहे. अशा घटनांच समर्थन होणार नाही माहिती घेऊन नक्की कारवाई केली जाईल.

भास्कर जाधव नेहमी ज्या पद्धतीने वागतात, संस्कार आणि संस्कृती सोडून वागतात, राणे परिवाराबद्दल त्यांनी व्यक्तिगत जी टीका केली, उद्धव ठाकरे यांच्यासमोर त्यांनी हे भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी म्हणणे अपेक्षित आहे. पण उद्धव ठाकरे त्यांना थांबवतील किंवा म्हणतील हे आपले संस्कार नाहीत. पण त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे त्याचा हा परिणाम झाला.

Pune : पुणे लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार कोणत्या समाजाचा?

रॅली काढणे हा आमचा अधिकार आहे. पण चिपळूण मध्ये जे झाले त्याची (Pune) माहिती मला घ्यायची आहे. पण सुरुवात मात्र भास्कर जाधव यांनी केली.

नारायण राणे यांच्या व्यंग आणि भाष्याबद्दल पत्रकारांनी विचारले की नारायण राणे यांना तुम्ही कधी समज दिली आहे का? यावर ते म्हणाले, की ते संजय राऊत यांच्या वक्तव्याला उत्तर देतात. संजय राऊत यांना जर उद्धव ठाकरे यांनी समज दिली तर आम्ही नारायण राणे यांना समज देऊ. ठाकरे यांनी ती समज द्यावी.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.