Pune : पुणे लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार कोणत्या समाजाचा?

एमपीसी न्यूज – राज्यसभेसाठी प्रा. मेधा कुलकर्णी यांना (Pune)उमेदवारी दिल्यानंतर आता पुणे लोकसभेला मराठा समाजातील उमेदवाराला संधी मिळणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

 

त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा उमेदवार कोणत्या समाजाचा (Pune)असणार याची उत्सुकता लागली आहे. काँग्रेसतर्फे 20 जणांनी उमेदवारी अर्ज दिले आहेत. त्यात प्रामुख्याने शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार मोहन जोशी, आमदार रवींद्र धंगेकर, प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड, प्रवक्ते गोपाळ तिवारी दावेदार आहेत.

Pune : भ्याड हल्ले करून कोणीच कुणाला थांबवू शकत नाहीत; देवेंद्र फडणवीस यांचा भास्कर जाधव यांना टोला

कसबा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर विजयी झाल्याने इतर विरोधी पक्षातील उमेदवारांचा आत्मविश्वास कमालीचा वाढला आहे. भाजपला त्यांच्या बालेकिल्ल्यात सुद्धा हरविता येऊ शकते, असा संदेश गेला आहे. पुणे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता काही दिवसातच लागणार आहे. त्यामुळे इतर सर्वच उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे.

कुलकर्णी यांना उमेदवारी देऊन भाजपने ब्राह्मण समाजाची नाराजी दूर केली आहे. 2019 च्या निवडणुकीत कुलकर्णी यांचे अचानकपणे तिकीट कापण्यात आले होते. कोथरूड मतदारसंघात प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर, कसबा पोटनिवडणुकीत दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या घरातील सदस्याला उमेदवारी न दिल्याने पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे ब्राम्हण समाज कमालीचा भाजपवर नाराज होता.
आगामी पुणे लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि भाजप कोणत्या समाजाच्या उमेदवारांना संधी देणार, याकडे लक्ष लागले आहे. भाजपतर्फे प्रामुख्याने आता माजी महापौर मुरलीधर मोहोळ, माजी खासदार संजय नाना काकडे, माजी आमदार जगदीश मुळीक प्रबळ दावेदार आहेत.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.