Pune : पूना क्लब गोल्फ कोर्सजवळ गोल्फ बॉल चेहऱ्यावर आदळल्याने दुचाकीस्वार जखमी, गोल्फ क्लब विरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पूना क्लब गोल्फ (Pune) कोर्सच्या बाउंड्री वॉलजवळ एका दुचाकीस्वाराच्या चेहऱ्यावर गोल्फ बॉल आदळल्याने दुचाकीस्वार रस्त्यावर पडला. त्याच्या डोळ्याला दुखापत झाल्याची घटना पुणे विमानतळ रोडवर घडली.

दुखापत झालेल्या व्यक्तीचे नाव अमोल विश्वनाथ नखाते (वय 30, रहाटणी) असून ते पेशाने वकील आहेत. त्यांनी तातडीने पूना क्लब गोल्फ कोर्सचे व्यवस्थापन आणि गोल्फ खेळणाऱ्या एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली.

Google News Initiative : अभिमानास्पद! गुगल न्यूज इनिशिएटिव्ह प्रोग्रामसाठी एमपीसी न्यूजची निवड

विमानतळ रोडवरील जीएसटी भवनासमोर 29 नोव्हेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली. नखाते हे एका सहकाऱ्यासह येरवडा येथील जिल्हा अधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात सुनावणीसाठी जात असताना त्यांना गोल्फचा चेंडू लागला.

घटनेनंतर नखाते व त्यांचे सहकारी येरवडा पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेले. नखाते यांच्या डोळ्याखाली जखमा (Pune) झाल्याने रक्तस्त्राव झाला आणि त्यानंतर त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात आले.

सार्वजनिक रस्त्यावर नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण करून अशा घटना टाळण्यासाठी गोल्फ कोर्सने पुरेशी खबरदारी घेतली नसल्याचा आरोप नखाते यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. पूना क्लब गोल्फ कोर्स व्यवस्थापन आणि अज्ञात गोल्फरविरुद्ध येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.