Pune : क्रांती दिन व युवक क्रांती दल स्थापना दिनानिमित्त शुक्रवारी रक्तदान शिबिर

एमपीसी न्यूज- क्रांती दिन व युवक क्रांती दल स्थापना दिनानिमित्त आज, शुक्रवारी संध्याकाळी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एफएम वाहिनीवरचे लोकप्रिय आरजे संग्राम यांची प्रमुख उपस्थितीत हे शिबिर होणार आहे.

महाराष्ट्र गांधी स्मारक निधी ( गांधी भवन ) कोथरूड येथे सायंकाळी 4 ते 9 या वेळेत हे शिबिर होणार आहे. महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दल, रक्ताचे नाते ट्रस्ट या संस्थांनी संयुक्तपणे आयोजन केल्याची माहिती युक्रांद चे शहराध्यक्ष सचिन पांडुळे, सुदर्शन चखाले, संघटक ऋतुजा पुकाळे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.