Pune BRT : पुण्यातील बीआरटी मार्ग बंद करा, पोलीस आयुक्तांच महापालिका आयुक्तांना पत्र

एमपीसी न्यूज :  वाहतूक कोंडी रोखण्यासाठी शहरात येणाऱ्या जड वाहनांना बंदी घालावी. पोलिसांकडून गर्दीच्या ठिकाणी वाहतूक नियमन व्हावे, (Pune BRT) अशी मागणी महापालिकेने पोलीस आयुक्तांकडे केली होती.मात्र, ही मागणी जिव्हारी लागलेल्या पोलीस आयुक्तांनी पालिकेलाच सल्ला दिला आहे…शहरातील वाहतूक कोंडी कमी करायची, असेल तर सर्व बीआरटी मार्ग बंद करा. अनावश्यक सायकल ट्रॅक काढून टाकावेत,असे पत्रच पालिका आयुक्त विक्रम कुमार यांना पाठवले आहे.

Chandani Chowk Accident : रस्ता ओलांडत असताना तरुणाचा अपघाती मृत्यू

नगर रस्ता, सातारा रस्ता तसेच सोलापूर रस्त्यावरील बीआरटी बंद करण्याची सूचना पोलीस आयुक्तांनी केली आहे.शहरात दिवाळीच्या आठवडाभर आधी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली.(Pune BRT) ऐन दिवाळीतही हीच स्थिती होती.त्यावरून कोंडी फोडण्यासाठी या दोन्ही विभागांनी एकत्र येऊन काम करण्याची मागणी केली होती.मात्र, पालिकेने दिलेल्या पत्र जिव्हारी लागलेल्या पोलिसांनी आता थेट पालिकेला पुन्हा पत्र लिहून बीआरटी मार्ग बंद करण्याचा सल्ला दिलाय.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.