Pune News : सहलीसाठी 34 विद्यार्थ्यांना घेऊन निघालेल्या बसचे ब्रेक फेल, चालकाच्या प्रसंगावधानामुळे वाचले मुलांचे प्राण

एमपीसी न्यूज : बारामतीच्या मोरगाव मधून एक मोठी बातमी पुढे आली आहे. एका खासगी क्लासच्या विद्यार्थ्यांना, सहलीसाठी घेऊन गेलेल्या बसचे ब्रेक अचानक फेल झाले. ही बाब चलकाच्या लक्षात येत त्याने जिवाची पर्वा न करता गाडीतून उडी मारत नागरिकांना सावध केले. एवढेच नाही तर बस खाली दगड टाकत त्याने बस थांबवण्याच्या प्रयत्न केला. (Pune News) असे असतांनाही बस थांबली नसल्याने चक्क समोर हात लाऊन एखाद्या सुपर हीरो सारखी बस थांबवण्याचा प्रयत्न या चालकाने केला. चालकाने दाखवलेल्या ह्या प्रसंगावधानामुळे मोठा अनर्थ टळला आहे. ही बस वरंधघाट मार्गे रायगड किल्ल्यावर विद्यार्थ्यांना सहलीसाठी घेऊन जात असताना पुण्याच्या भोरमधील चौपाटी परिसरात ही घटना घडली. बसमध्ये एकूण 34 विद्यार्थी होते. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

सहलीसाठी मोरगावमधील खासगी क्लासच्या 34 विद्यार्थ्यांना घेऊन मांढरदेवीचे दर्शन करून बस क्रमांक MH12 HC 9119 भोर वरंधघाट मार्गे रायगडला जात होती. भोर चौपाटीजवळ बसचा ब्रेक एअर पाईप फुटल्याने बसचे ब्रेक निकामी झाले. बसचे ब्रेक निकामी झाल्याचे समजताच चालकाने प्रसंगावधान दाखवले.

Pune Police : पुणे पोलिसांचे आता सुरक्षेसाठी पायी पेट्रोलिंग

बसचे ब्रेक निकामी झाल्याचे लक्षात येताच चालकाने रस्त्यावरच्या नागरिकांना सावध करत चालत्या बस मधून उडी मारली. यानंतर त्याने बस खाली मोठा दगड टाकला.(Pune News) मात्र, तरी सुद्धा बस थांबली नाही, यमुळे चक्क बस हाताने थांबवण्याचा प्रयत्न केला. ही बाब पाहून आजू बाजू चे नागरिक देखील बस थांबवण्यासाठी धावले. चालकाच्या या प्रसंगावधानामुळं मोठी दुर्घटना टळली. हा प्रकार जवळच असलेल्या एका सीसीटीव्हीत कैद झाला.

बसमधले सर्व विद्यार्थी सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच, पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहचून चालक आणि विद्यार्थ्यांना धीर देत रस्त्यावर झालेली वाहतूक कोंडी सोडवून वाहतूक सुरळीत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.