Pune Police : पुणे पोलिसांचे आता सुरक्षेसाठी पायी पेट्रोलिंग

एमपीसी न्यूज : पुण्यात गुन्हेगारीत सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळे पुणे पोलिसांनी आता सुरक्षेसाठी पायी पेट्रोलिंग करायला सुरुवात केली आहे.  (Pune Police) मागील काही दिवसांपासून पुण्यात रोज नवे गुन्हे समोर येत आहेत. त्याला आळा घालण्यासाठी पुण पोलिसांकडून अनेक उपाययोजन राबवण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आता पुणे पोलिसांनी गाड्यांमधून नाही तर पायी पेट्रोलिंगला सुरुवात केली आहे.

पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिसांचा गुन्हेगारी रोखण्यासाठी हा अनोखा उपक्रम सुरू केला आहे. पुणे शहरामध्ये गुन्हेगारी रोखण्यासाठी पुणे पोलीस ॲक्शन मोडवर आल्याचं दिसत आहे. पुण्यात मोठ्या प्रमाणात गर्दीची अनेक ठिकाणं आहेत. या सर्व ठिकाणी गाडी घेऊन पेट्रोलिंग करणं शक्य होत नाही.

त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी पायी पेट्रोलिंग पोलिसांकडून सुरू करण्यात आलं आहे. पायी पेट्रोलिंगमुळे जनतेशी संवादही साधता येतो आणि गुन्हेगारीलाही आळा बसतोय, (Pune Police) असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन दिवसाआड पायी पेट्रोलिंग करून जनजागृती करत आहेत. दहशत माजवणाऱ्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून सर्व पातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

Pimpri News : जाब विचारला म्हणून मारहाण करणाऱ्या तरुणाला अटक

मागील सहा महिन्यांपासून पुण्यात दहशत माजवणाऱ्या गॅंग धुमाकूळ घालत आहे. कोयता गॅंग आणि चुहा गॅंगच्या अनेक आरोपींना पोलिसांनी जेरबंद केलं आहे. (Pune Police) मात्र या गॅंग अजूनही दहशत माजवत आहेत. त्यामुळे पुणे पोलीस चांगलेच अॅक्शन मोडवर आले आहेत. कोयता विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. त्यासोबतच अनेक कोयतेदेखील जप्त केले आहेत.

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पुणे पोलिसांनी गुंडाना पकडणार्‍या पोलिसांवरही पोलीस दल बक्षीसांची खैरात करणार आहे.  त्याचप्रमाणे पुण्यात कोणी कोयता खरेदी करत असेल तर आधी आधार कार्ड दाखवावे लागणार आहे. पुणे पोलिसांनी हा नियम काढला आहे. अशा एक ना अनेक उपाययोजना पुणे पोलिसांमार्फत गुन्हेगारी रोखण्यासाठी करण्यात येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.