Pune : शहरातील व्यवहार दुसऱ्या दिवशीही विस्कळीतच ; अनेक दुकाने बंदच

एमपीसी न्यूज – राज्य सरकारच्या प्रशासनात एकवाक्यता नसल्याने तसेच अद्याप कोरोनाची साथ आटोक्यात आलेली नाही या कारणांमुळे लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशी शहरातील व्यवहार विस्कळीत झाल्याचे पाहायला मिळाले.

पुणे शहरात कंटेन्मेट आणि नॉन कंटेन्मेट असे दोन विभाग करण्यात आले. आहेत. नॉन कंटेन्मेट क्षेत्रात सकाळी दहा ते संध्याकाळी सहा या वेळात जीवनावश्यक वस्तूंसह अन्य सर्व दुकाने चालू राहातील, असे सोमवारी रात्री पोलीस खात्याकडून सांगण्यात आले. परंतु, सरकारच्या विविध खात्यांमध्ये एकवाक्यता नसल्याने दुकानदारांनी दुकाने उघडली नाहीत. पोलीस खात्याकडून त्रास दिला जातो, अशा तक्रारी करण्यात आल्या.

शिवाय शहरातील अनेक पेट्रोल पंपही बंद होते. त्याही कारणाने दुकानदार दुकानांपर्यंत पोहोचू शकले नाहीत. काही व्यापाऱ्यांचे म्हणणे होते की, दुकान उघडले तर गर्दी होईल याकारणाने संसर्ग टाळण्यासाठी दुकाने उघडली नाहीत. अनेक भागात पोलीसांनीही लोकांना हटकले. त्यामुळे लोकं बाहेर पडली नसल्याने दुकाने उघडली नाहीत. दुसऱ्या दिवशीही गोंधळ चालूच राहिला.

वृत्तपत्र वितरणासाठी काही अटी घालून परवानगी देण्यात आली. मात्र, वृत्तपत्रांचे वितरणही झाले नाही. वृत्तपत्र व्यवस्थापन आणि वृत्तपत्र विक्रेते यांच्यात आज चर्चा चालू होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.