Pune : स्केटिंग स्पर्धेतील सहभागी खेळाडूच्या उपचारासाठी चंद्रकांत पाटील यांची सर्वतोपरी मदत

एमपीसी न्यूज – सध्या राज्याच्या राजकीय परंपरेत (Pune) सुसंस्कृत आणि संवेदनशील व्यक्तीमत्त्व आहेत, त्यामध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांचे नाव आग्रक्रमाने घेतले जाते. त्यांचा संवेदनशिलतेचा परिचय कोथरुडमधील नागरिकांना पदोपदी येत असतो. राज्यातील खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने नमो चषक-२०२४ चे आयोजन करण्यात आले आहे.

या अंतर्गत राज्यभरात विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. कोथरुडमध्ये ही रविवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कोथरुडमधील स्केटिंगमध्ये निष्णात असलेल्या अनेक स्पर्धकांनी यात सहभाग घेतला होता. या स्पर्धेत ओवेश तांबोळी कात्रज येथील स्केटिंगपटूनेही सहभाग नोंदवला होता. गेली सहा वर्षांपासून ओवेश स्केटिंगचा सराव करत असल्याने, त्याने त्याच विशेष कौशल्य मिळवले होते.

Pune : पुणे महानगरपालिकेच्या वर्धापनदिनानिमित्त ‘घरोघरी हीच बोंब’ नाटकाचे सादरीकरण

स्पर्धेत सुरु होता क्षणीच ओवेशचा तोल जाऊन पडल्याने त्याच्या कंबरेला गंभीर दुखापत झाली. भाजपा कोथरूड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, सरचिटणीस प्रा. अनुराधा एडके, राज तांबोळी आणि युवा मोर्चा अध्यक्ष अमित (Pune) तोरडमल या सर्वांनी तातडीने ओवेशला रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर डॉ. बुटाला यांनी सर्व हकिकत पाटील यांना सांगितली. चंद्रकांत पाटील यांना ही सर्व माहिती समजताच, त्यांनी तातडीने मंडल अध्यक्ष डॉ. बुटाला यांना यात जातीने लक्ष घालण्याची सूचना केली. तसेच, उपचारावर सर्व खर्च आपण करणार असल्याचेही सांगितले.

त्यानुसार डॉ. बुटाला यांनी आपल्या सर्व सहकाऱ्यांसह रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा केली; आणि खर्चाची कोणतीही काळजी करु नका. ओवेशला उत्तमोत्तम उपचार द्यावेत, अशी सूचना केली. त्यानुसार, डॉक्टरांनीही अतिशय तातडीने त्याच्यावर योग्य उपचार सुरु केले. त्यामुळे ओवेशवरील गंभीर संकट टळले. चंद्रकांत पाटील यांच्या समयसूचकतेमुळे आणि संवेदनशीलतेमुळे ओवेश आराम मिळाला. त्यामुळे तांबोळी कुटुंबियांनी पाटील यांचे आभार मानले. चंद्रकांत पाटील यांची संवेदनशीलता पाहून सर्वांनाच अभिमान वाटला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.