Bye-Election :  राष्ट्रवादीकडून 20 स्टार प्रचारक

एमपीसी न्यूज – पुण्यातील कसबा पेठ आणि पिंपरी-चिंचवड शहरातील चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने (Bye-Election) 20 स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील तसेच जिल्ह्यातील स्थानिक नेत्यांचाही समावेश करण्यात आला आहे.

चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी  26 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना 20 स्टार प्रचारकांची यादी पाठवली आहे.

Chinchwad Bye Election : मतदान करण्यासाठी मतदार येणार थेट ‘कॅलिफोर्निया’वरुन

स्टार प्रचारकांमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, (Bye-Election) खासदार सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, सुनील तटकरे, फौजिया खान, वंदना चव्हाण, आमदार एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, धनंजय मुंडे, शशिकांत शिंदे, चिंचवड विधानसभा प्रभारी, आमदार सुनील शेळके, नीलेश लंके, अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, अली शेख यांचा 20 जणांच्या प्रचाराकांच्या यादीत समावेश आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.