Pune : महापालिकेला कोरोनाचा फटका; मिळकत कराचे उत्पन्न कमी

एमपीसी न्यूज – कोरोनाचा फटका पुणे महापालिकेला मोठ्या प्रमाणात बसला आहे. मिळकत कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. सध्या केवळ 102 कोटी रुपये मिळकत कर जमा झाला आहे. 2020 – 21 चा तब्बल 1 हजार 511. 75 कोटी एवढा मिळकत कर जमा होणे अपेक्षित आहे.

महापालिकेचे बजेट हे 6 हजार कोटींच्या आसपास आहे. उत्पन्न घटल्याने याचा परिणाम विकासकामांवर होणार असल्याची चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन जाहीर केला आहे. या कालावधीत नागरिकांना ऑनलाइन मिळकत कर भरण्याचे आवाहन महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी केले आहे.

_MPC_DIR_MPU_II

पुणे महापालिका हद्दीत एकूण 10 लाख 57 हजार 716 एवढ्या मिळकती आहेत. जुन्या हद्दीतील एकूण मिळकतीची संख्या 9 लाख 13 हजार आहे. या मिळकत धारकांकडून तब्बल 1 हजार 365. 24 कोटी मिळकत कर येणे बाकी आहे. तर, पुणे महापालिकेत समाविष्ट झालेल्या गावांत 146.51 कोटी मिळकत कर येणे बाकी आहे. नागरिकांना रोख आणि ऑनलाइन मिळकत कर भरण्याची शहरात 25 ठिकाणी सुविधा महापालिकेतर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.

कोरोनाचा संकट काळात महापालिकेच्या तिजोरीत सध्या प्रचंड खळखळाट आहे. समाजातील दानशूर मंडळी, विविध सामाजिक संस्थांना आर्थिक मदत करण्याचे आवाहन पुणे महापालिकेतर्फे करण्यात आले आहे. जवळपास दीड महिन्यापेक्षा जास्त पुणे शहरात लॉकडाऊन सुरू आहे.

शहरातील 5 वार्डात तर अतिशय गंभीर परिस्थिती आहे. त्या ठिकाणी आणखी कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश पालकमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. तर, कोरोना नसलेल्या भागांत सध्या 12 तास दुकाने सुरू करण्याचे आदेश महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.