Pune News : लसीचे दोन डोस घेतले असतील तरच मिळणार लोणावळ्यात प्रवेश 

एमपीसी न्यूज: पुण्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळी म्हणजे लोणावळ्यात लसीचे दोन डोस घेतले असतील तरच प्रवेश मिळणार आहे. यासाठी प्रशासनाकडून मुंबई आणि पुण्याच्या एन्ट्री पॉइंटवर चेक पोस्ट लावण्यात येणार आहेत.

सोमवारी 17 जानेवारीपासून याची अंमलबजावणी सुरू होईल. शिवाय ज्यांनी दुसरा डोस घेतला नसेल आणि त्यांची मुदत ओलांडली असेल तर नाक्यावरच त्या व्यक्तीस लस टोचली जाणार आहे. वडगाव मावळ तालुक्यातील लोणावळ्यासह कामशेत, कान्हे रेल्वे गेट, वडगाव आणि तळेगावच्या एन्ट्री पॉइंटवर ही अशीच नाकाबंदी करण्यात येणार आहे. दिवसोंदिवस तालुक्यात कोरोनाचे रुग्ण वाढू लागली आहे, यामुळे  ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या आठशे पार गेली आहे. कोरोनाचा विळखा वाढू लागल्याने तालुका प्रांताअधिकाऱ्यांकडून  अशी खबरदारीची पावले उचलण्यात  आहेत. एन्ट्री पॉइंटच्या प्रत्येक चेकपोस्टवर नगरपंचायत आणि नगरपरिषद प्रशासनाच्या मदतीला पोलीस ही तैनात असतील. ते प्रत्येक व्यक्तीला चेक पोस्टवर रोखणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.