22.4 C
Pune
शनिवार, ऑगस्ट 13, 2022

Pune Corona Update : पुण्यात 264 नवे रुग्ण ; 214 जणांना डिस्चार्ज

spot_img
spot_img

एमपीसी न्यूज : कोरोना विषाणुंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहर आणि उपनगरात केलेल्या ठोस उपाययोजनांमुळे नव्या रुग्णांची संख्या संथगतीने घटत आहे. आज पुण्यात नवे 264 रुग्ण सापडले. तर 214 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

शहरातील कंटेन्मेंट झोनची संख्या शुन्यावर आली आहे. तरी खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेच्या रुग्णालये, खासगी रुग्णालये आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कोविड केयर सेंटर सुरु आहेत. त्यामध्ये एकूण 2 हजार 689 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. त्यापैकी 208 रुग्ण गंभीर असून 305 जण ऑक्सिजन बेडवर आहेत. आज कोरोनामुळे पुण्यात 7 जण दगावले आहेत. आतापर्यंत पुण्यात 1 लाख 74 हजार 143 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

तरीही महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून पुणेकरांनी निर्धास्त न राहता घराबाहेर पडताना, विविध ठिकाणी वावरताना मास्क, हँड सॅनिटायजर आणि सोशल डिस्टंन्सिग नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच सौम्य ते तीव्र लक्षणे आढळल्यास तातडीने अँटीजेन, स्वॅब टेस्टींग करुन खबरदारी घ्यावी. तसेच नजिकच्या रुग्णालयात औषधोपचार सुरु करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

spot_img
Latest news
Related news