Pune : कोरोनाचा फटका; महापालिका करणार 1500 सदनिकांचा थेट लिलाव

Corona's blow; Municipal Corporation will conduct direct auction of 1500 flats. पुणे महापालिकेच्या तब्बल 10 हजार सदनिका आहेत. मालमत्ता विभागाकडे 3 हजार सदनिका आहेत. त्यातील 1500 सदनिकांचा थेट लिलाव करण्यात येणार आहे. त्यातून महापालिकेला सुमारे 200 कोटी रुपये उत्पन्न मिळणार असल्याचा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केला.

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या संकटामुळे पुणे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आता उत्पन्न वाढविण्यासाठी सदनिकांचा थेट लिलाव करण्यात येणार आहे. त्यातून महापालिकेला साधारण 200 कोटी उत्पन्न मिळणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी सोमवारी पत्रकारांना दिली.

कोरोनाचा संकटामुळे महापालिकेच्या तिजोरीत प्रचंड खडखडाट आहे. हे संकट परतावून लावण्यासाठी महापालिकेला उत्पन्न आवश्यक आहे. हेमंत रासने यांनी सुरुवाती पासूनच उत्पन्न वाढविण्यावर भर दिला आहे.

पुणे महापालिकेच्या तब्बल 10 हजार सदनिका आहेत. मालमत्ता विभागाकडे 3 हजार सदनिका आहेत. त्यातील 1500 सदनिकांचा थेट लिलाव करण्यात येणार आहे. त्यातून महापालिकेला सुमारे 200 कोटी रुपये उत्पन्न मिळणार असल्याचा विश्वास हेमंत रासने यांनी व्यक्त केला.

कोणत्याही परिस्थितीत या सदनिका पडून ठेवायच्या नाहीत. भाड्याने द्यायच्या नाहीत. त्याचा थेट लिलावच करणार असल्याचे रासने यांनी निक्षून सांगितले.

पुणे महापालिकेचे 2020 – 21 चे बजेट 7 हजार 390 कोटींचे आहे. याच बजेटची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. कोरोना संकट काळातही महपालिकेला 350 कोटी रुपये उत्पन्न ऑनलाईन जमा झाले आहे. त्याला केवळ 2 महिन्यांचा कालावधी झाला आहे. आणखी 10 महिन्यांत उत्पन्न वाढविण्यावर भर देणार असल्याचे हेमंत रासने म्हणाले.

कोरोनाचा संकट काळात मागील अडीच महिन्यांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे. तरीही पुणेकरांनी मिळकत कराचे ऑनलाईन 350 कोटी रुपये जमा केले आहे. ही महत्वपूर्ण बाब आहे. त्यामुळे आयुक्तांनी 2 महिन्यांत लगेच पुरवणी बजेट मंजूर करणे बरोबर नाही. आगामी काळातही महापालिकेचे उत्पन्न वाढू शकते, असा रासने यांना विश्वास आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like