Pune Crime : नक्षलवादी अरुण भेलके याला माओवादी संघटनेचा सदस्य असल्याने कोर्टाने सुनावली 8 वर्षांची शिक्षा

एमपीसी न्यूज : पुणे न्यायालयाने (Pune Crime) नक्षलवादी अरुण भेलके याला बुधवारी आठ वर्षांची शिक्षा सुनावली आहे. भारतीय दंड संहिता (IPC) आणि बेकायदेशीर क्रियाकलाप प्रतिबंध कायदयाच्या (UAPA) कलमांखाली भारतीय कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI-Maoist) या प्रतिबंधित संघटनेचा सक्रिय सदस्य असल्याबद्दल त्याला दोषी ठरवण्यात आले.

विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांनी दिलेल्या आदेशात भेलके याला आयपीसीच्या कलम 420, 467, 468, 471 आणि 474 आणि यूएपीएच्या कलम 20 आणि 38 अंतर्गत दोषी ठरवण्यात आले आहे.

आठ वर्षांची कमाल शिक्षा झाल्यानंतर त्याची तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. सप्टेंबर 2014 मध्ये एसीपी भानुप्रताप बर्गे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) भेलके यांना त्याची पत्नी कांचन ननावरे यांच्यासह पुणे ग्रामीणमधील कान्हे फाटा येथून अटक केली होती. कासेवाडी झोपडपट्टी  येथून अटक (Arrest) केली होती. तो संजय कांबळे या नावाने पुण्यात राहत होता. त्याच्यासह पत्नी कांचन हिलाही पोलिसांनी अटक केली. पुण्यातील मास मूव्हमेंट नावाच्या संघटनेच्या (Pune Crime) संपर्कात राहून या तरुणांना ‘अर्बन नक्षलवादा’साठी तयार करण्याचे काम तो करीत होता.

अरुण आणि कांचन दोघेही चंद्रपूरचे आहेत. दोघेही भाऊवादी संघटनेचे सक्रिय सदस्य असून संघटनेच्या आदेशानुसार पुणे आणि मुंबई या शहरात काम करून येथील तरुणांना माओवादी चळवळीत ओढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. मुंबईत वास्तव्यास असताना अरुण भेलके हे एल्गार प्रकरणातील आरोपी सुधीर ढवळे यांच्या रिपब्लिकन पॅंथर संघटनेच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात होते.

Pune : एसटीने मागून धडक दिल्याने कारने घेतला पेट

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.