Alandi : गुरुवर्य वै. विठ्ठल महाराज चौधरी यांचा बारावे पुण्यस्मरण सोहळा संपन्न

एमपीसी न्यूज : वारकरी संप्रदायाचे वै.पु.गुरुवर्य विठ्ठल महाराज चौधरी (Alandi) अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था यांच्या बारावे पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळेत वारकरी सांप्रदायिक कीर्तन व हरिपाठ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

हा कार्यक्रम शांतिब्रम्ह मारोती महाराज कुरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाने पार पडला. या कार्यक्रमामध्ये ह. भ. प. उल्हास महाराज सूर्यवंशी, ह. भ. प. डॉ.नारायण महाराज जाधव, ह. भ. प. रामभाऊ महाराज राऊत, ह. भ. प. परमेश्वर महाराज जायभाये व शांतिब्रम्ह मारोती महाराज कुरेकर यांची किर्तनसेवा संपन्न झाली.

या कार्यक्रमादरम्यान वारकरी संप्रदायाचे अध्वर्यु वै.पु.गुरुवर्य विठ्ठल महाराज चौधरी अध्यक्ष वारकरी शिक्षण संस्था यांच्या बारावे पुण्यस्मरण महोत्सवी सोहळ्या निमित्त त्यांच्या नावाचा आयोजित करण्यात आलेला पुरस्कार ह. भ. प. रामकृष्ण महाराज लहवितकर यांना शांतिब्रम्ह मारोती महाराज कुरेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच त्यांना रोख 15,111 रुपये आणि सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, फेटा,पोशाख, श्रीफळ देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.

या निमित्त आयोजित महाअन्नदान उपक्रमात सुमारे (Alandi) दहा हजार भाविकांना प्रसाद स्वरूपात देण्यात आले. या कार्यक्रमा निमित्त मुकेकर शास्त्री महाराज, चंदिले नाना महाराज, वारकरी संप्रदयातील मान्यवर व आळंदी ग्रामस्थ उपस्थित होते. याबाबतच माहिती तुकाराम महाराज मुळीक यांनी दिली.

Pune Crime : नक्षलवादी अरुण भेलके याला माओवादी संघटनेचा सदस्य असल्याने कोर्टाने सुनावली 8 वर्षांची शिक्षा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.