Pune Crime News : एकाच दिवसात नऊ चोरी केलेल्या आरोपीवर मोक्काअंतर्गत कारवाई

एमपीसी न्यूज – कोंढवा, हडपसर,  चंदननगर भागात एकाच दिवसात नऊ चोरी करणार्या दोघांना अटक करुन त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई केली.

 

ओंकार विनोद मासाळ ऊर्फ हर्षद सलीम शेख (वय 22,रा. जुना बाजार,मंगऴवार पेठ), आशिष ऊर्फ गुड्डू रविंद्र चव्हाण (वय 23, रा.609 नवीन म्हाडा बिल्डींग,हिंगणे मळा, हडपसर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. यामधील सराईत गुन्हेगार ओंकार मासाळ हा पोलीस रेकॅर्डवरील गुन्हेगार आहे.त्याच्याविरुध्द वानवडी, हडपसर, लोणीकंद, मुंढवा, खडक, फरासखाना, मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात आणि नगर जिल्ह्यातील जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

 

मासाळ आणि चव्हाण यांनी हिंसक मार्गाचा अवलंब करुन स्वत:चे आणि टोऴीचे वर्चस्व राखण्यासाठी अवैध मार्गाचा वापर केला होता. नुकतेच मासाळ याने हडपसर येथील आकाशवाणीजवळून जाणार्या एका व्यक्तीवर चाकूने हल्ला करुन त्याचा मोबाईल आणि पैसे चोरुन नेले होते.या प्रकरणी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी कायद्याव्दारे (मोक्का) ओंकार मासाळ याला अटक केली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.