-MPC-TOP-MOST-BANNER-I

Pune Crime News : हडपसर परिसरातील सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसीन्यूज : पुणे शहरातील गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवाया संपुष्टात आणण्यासाठी पुणे पोलीस आयुक्त यांनी मागील काही दिवसांपासून गुन्हेगारी टोळ्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात केली. पोलीस आयुक्तांनी आतापर्यंत 35 टोळ्यांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई केली आहे. त्यात आणखी एकाची भर पडली असून हडपसर परिसरातील दोघा सराईत गुन्हेगारांना मोक्का लावला आहे.

पुरुशोत्तम उर्फ बंड्या राजेंद्र वीर (वय 25) आणि संजय उर्फ सोन्या हरिष भोसले (वय 21) अशी या सराईत गुन्हेगारांची नावे आहेत. त्याच्याविरोधात दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, वाहनचोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, दोघेही आरोपी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. पुरुषोत्तम ऊर्फ बंड्या वीर याच्याविरोधात पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील एकूण 18 गुन्हे दाखल आहेत. सोलापूरचा संजय हरिष भोसले यांच्या विरुद्ध 7 गुन्हे दाखल आहेत. त्यांची ही गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी पाहून त्यांच्याविरोधात मोक्का कारवाई करण्यास मंजुरी मिळणे बाबतचा प्रस्ताव अप्पर पोलिस आयुक्त अशोक मोराळे यांना सादर केला होता.

या सर्व प्रस्तावाची छाननी केल्यानंतर मोराळे यांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.