Pune Crime News: खडकवासला धरण्याच्या बॅक वॉटरमध्ये आढळले दोन तरुणांचे मृतदेह

एमपीसी न्यूज – पुणे शहराजवळ असलेल्या खडकवासला धरणाच्या बॅक वॉटर मध्ये आज सकाळच्या सुमारास दोन तरुणांचे मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे.

धरणाजवळ असलेल्या मोऱ्यांमध्ये काही नागरिक कपडे धुण्यासाठी गेले असताना ही घटना उघडकीस आली. या नागरिकांना तरुणांचे मृतदेह तरंगताना दिसल्यानंतर त्यांनी धरणावर कार्यरत असलेल्या सुरक्षारक्षकांना याची माहिती दिली. सुरक्षारक्षकांनी घटनास्थळावर धाव घेत दोन्ही मृतदेह बाहेर काढले.

विजय नागनाथ रोकडे (वय 23) आणि रॉबिन कुबेर वाघमारे (वय 23) अशी मयत तरुणांची नावे आहेत. मागील दोन दिवसांपासून हे दोघे ही बेपत्ता असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दोन्ही मयत तरुण माळवाडी परिसरात राहत होते. दोन दिवसांपूर्वी दोघेही एकत्र घराबाहेर पडले होते. त्यानंतर ते घरी परत आलेच नाहीत. दरम्यान या दोघांचाही मृत्यू धरला तर होत असताना बुडून झाला असावा असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मयत तरुणांच्या सोबत असलेल्या वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. त्यांच्या मृत्यूमागे याव्यतिरिक्त काही कारण आहे का याचा शोध पोलिस घेत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.