Pune Crime News : रस्ता चुकल्याने कंटेनर चालकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार; जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज – रस्ता चुकल्याच्या कारणावरून कंटेनर चालकाच्या डोक्यात लोखंडी रॉडने मारहाण करून त्याचा खून करण्यात (Pune Crime News )आला. वढू बुद्रुक गावाच्या हद्दीतील तुळापूर ते लोणीकंद रस्त्यावर 26 जानेवारी रोजी ही घटना घडली.

शहजाद अब्दुल कयूम अहमद (वय 26, रा. पोखर भिटवा, उत्तर प्रदेश) असे खून झालेल्या चालकाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा सहकारी समसुल अली अहमद खान (उत्तरप्रदेश) त्याच्या विरोधात लोणीकंद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : गणेश मंडळे व वंचित विकास मंडळाच्या पुढाकाराने अभयांच्या हस्ते गणेशयाग

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादीच्या मालकीचा कंटेनर मयत  चालवत होता. तर आरोपी त्याचा सहकारी होता. 26 जानेवारी रोजी वडू बुद्रुक गावाच्या हद्दीत कंटेनर चा रस्ता चुकल्याच्या कारणावरून दोघांमध्ये वाद झाले. त्यानंतर आरोपीने लोखंडी रॉडने शहजाद याच्या डोक्यात मारहाण केली. वर्मी घाव बसल्याने शहजाद याचा जागीच मृत्यू झाला.

त्यानंतर त्याचा मृतदेह कंटेनरच्या केबिनमध्ये ठेवून आरोपी पळून गेला आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू (Pune Crime News ) आहे. संजय रामफळ कालीरामना (वय 41, गुजरात) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.