Pune Crime News : सराईत वाहनचोराला अटक; पुणे, पिंपरी चिंचवड, नगरमधून चोरी केलेल्या 18 दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण आणि अहमदनगरमधून दुचाकी चोरी करणा-या उस्मानाबाद येथील सराईत वाहन चोराला अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या युनिट पाचने त्याला घोरपडी येथून ताब्यात घेत त्याच्याकडून 18 दुचाकी जप्त केल्या आहेत.

शंकर भरत देवकुळे (वय 28, रा. तुळजापूर, उस्मानाबाद) असे अटक आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पुण्यातील 11, पिंपरी-चिंचवड 3, अहमदनगर 1 व पुणे ग्रामीण 1 असे एकूण 16 गुन्हे उघडकीस आले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी रेकॉर्डवरील आरोपी असून तो आपल्या पत्नीला भेटण्यासाठी घोरपडी येथे येणार असल्याची माहिती युनिट 5 च्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी या भागात सापळा रचून त्याला अटक केली. आरोपीकडून 7 लाख 50 हजार किंमतीच्या 18 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.