Pune Crime : चुकीच्या इंजेक्शनने तरुणाला गमवावा लागला जीव; डॉक्टरांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज : एका चुकीच्या इंजेक्शनने (Pune Crime) पेशंटचा जीव गमवल्याने डॉक्टरांसह नर्सवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सव्वा वर्षानंतर उलगडला आहे. अतुल तुपसौंदर्य असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. 

डॉ. खालीद सय्यद आणि महिला डॉक्टर तसेच परिचारिकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कविता अतुल तुपसौंदर्य यांनी खडकी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अतुल यांना सप्टेंबर 2021 मध्ये अंगात (Pune Crime) कणकण वाटत होती. यासाठी ते 21 तारखेला खडकीतील जुना बाजार येथील डॉ. सय्यद यांच्या हॉस्पिटलमध्ये गेले होते. त्यावेळी हॉस्पिटलमध्ये असलेल्या डॉ. खालीद आणि महिला डॉक्टर यांनी अतुल यांच्या कमरेवर इंजेक्शन दिले. हे इंजेक्शन चुकीचे असल्यामुळे अतुल यांना त्या जागी इन्फेक्शन झाले. या नंतर त्यांना ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र 3 दिवसात त्यांचा मृत्यू झाला.

Pimpri News : कचरा वाहतूक व्यवस्थेची अधिका-यांनी केली पाहणी

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अतुल यांचा मृत्यू झाल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या अध्यक्षतेखाली एक तज्ञ समिती स्थापन करण्यात आली आणि सव्वा वर्षानंतर याबाबत अहवाल आता समोर आला आहे. अहवालातून समोर आलेल्या निष्कर्षानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून खडकी पोलिसांकडून तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.