Pune : ज्येष्ठ पत्रकार डी. आर. कुलकर्णी यांचे निधन

एमपीसी न्यूज- दैनिक सकाळचे मुख्य उपसंपादक ध्रुवकुमार राजाराम तथा डी. आर. कुलकर्णी (वय 53) यांचे आज (सोमवारी) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुलगे असा परिवार आहे. डी. आर. कुलकर्णी यांच्या पार्थिवावर आज सकाळी साडेअकराच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

लोकसत्तामध्ये संपादकीय सहायक म्हणून रुजू झालेले डी. आर. कुलकर्णी पत्रकारितेची आवड असल्याने पुढे उपसंपादक झाले. वरिष्ठ उपसंपादक व मुख्य उपसंपादक म्हणून त्यांनी पदोन्नती मिळवली. सध्या ते दैनिक सकाळमध्ये मुख्य उपसंपादक म्हणून कार्यरत होते.

पुणे श्रमिक पत्रकार संघाचे माजी सरचिटणीस तर पत्रकार प्रतिष्ठानचे कार्यवाह होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.