Pune : धनगर समाज आरक्षण; मुख्यमंत्र्यांनी एवढी सकारत्मकता दाखवल्यावर निश्चित मार्ग निघेल – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज : आपल्या लाडक्या गणरायाचे (Pune ) आगमन होऊन तीन दिवस झाले. त्या निमित्ताने भाजपचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे शहरातील मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी गणरायाची आरती देखील केली. त्यानंतर शहरातील इतर मंडळाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाले.

यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी दरवर्षी पुण्यात येऊन मानाच्या गणपतीचे दर्शन घेत आहे. पुण्याचे आणि गणेशोत्सवाचे नाते आहे. पुणे शहरातून सार्वजनिक गणेशोत्सव देशभर पोहोचला आहे. त्याची खरी सुरुवात पुण्याने केली आहे. गणरायाने सर्व विघ्न दूर करावे, अशी प्रार्थना गणरायाकडे केल्याचे त्यांनी सांगितले.

धनगर समाजाच्या आरक्षणच्या प्रश्नावर ते म्हणाले की,राज्य सरकारने हा प्रश्न सोडविण्यासाठी सकारात्मक पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्र्यांनी एवढी सकारत्मकता दाखवल्यावर निश्चित मार्ग निघेल अशी भूमिका यावेळी त्यांनी मांडली.
संसदेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झाले आहे.

त्यावरून अनेक सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेते मत मांडत (Pune) आहेत. त्या दरम्यान पुरुष मंडळी कारभार पाहतील असे विधान बच्चू कडू यांनी मांडले आहे. त्या प्रश्नावर ते म्हणाले की,महापालिका, जिल्हा परिषद यामध्ये महिलांना आरक्षण दिले.त्यावेळी देखील अशाच प्रकारची विधान करण्यात आली होती.

पहिल्या पाच वर्षांत त्या प्रकारच वातावरण होते.पण त्यामध्ये हळूहळू बदल होत गेला.तसेच आजही आरक्षण नसताना संसदेत 81 महिला खासदार आहेत.आता आरक्षणाचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे 100 महिलांची भर पडणार आहे. त्यामुळे मी त्यांच्या मताशी सहमत नसल्याची भूमिका मांडली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.