Pune : वाढलेल्या कंटेन्मेंट झोनमध्येही जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करा – राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसेची मागणी

Distribute kits of essential items even in increased containment zones - Demand of NCP, Shiv Sena, Congress, MNS

एमपीसी न्यूज – पुणे शहरात वाढलेल्या कंटेन्मेंट झोनमध्येही जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस आणि मनसेतर्फे करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतर्फे कंटेन्मेंट झोन पूर्वी निश्चित केले होते. त्या ठिकाणी अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे 70 हजार किट्स वाटप करण्याचा निर्णय झाला होता. सद्यस्थितीत पुणे शहरातील कंटेन्मेंट झोन बदलले असून या झोनची संख्याही वाढलेली आहे.

या कंटेन्मेंट झोनमधील नागरिकांना पूर्वीच्या नियमाप्रमाणे अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे किट्स वाटप करण्याचा निर्णय घेण्यात यावा, असा प्रस्ताव स्थायी समितीला विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेसचे गटनेते आबा बागुल, मनसेचे गटनेते वसंत मोरे यांनी दिला आहे.

पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व संकट आहे. मागील 4 महिन्यांपासून सामान्य माणसाची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे.

त्या पार्श्वभूमीवर नागरिकांना दिलासा देण्यासाठी वाढलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे किट वाटप करण्यात यावे, असे दीपाली धुमाळ आणि पृथ्वीराज सुतार यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.