Pune : डॉक्टर वैशाली जाधव यांच्याकडून पीसीपीएनडीटीचा कार्यभार काढला

एमपीसी न्यूज- शहरातल्या बेकायदा गर्भपात केंद्राविरोधात मोहीम सुरु करणाऱ्या धडाडीच्या पुणे महापालिका आरोग्य विभागाच्या डॉ. वैशाली जाधव यांच्याकडील पीसीपीएनडीटीचा (प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान कायदा) कार्यभार काढून घेण्यात आला असून हा कार्यभार डॉ कल्पना बळीवंत यांच्याकडे देण्यात आला आहे. या संबंधीचा आदेश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी काढला आहे.

शहरातल्या बेकायदा गर्भपात केंद्राविरोधात डॉ जाधव यांनी उघडली मोठी आघाडी उघडली होती. अनेक जणांच्या विरोधात केसेस दाखल करण्यात आल्या होत्या. डॉक्टर लॉबीच्या दबावापोटी हा आदेश काढल्याची चर्चा आहे. न्यायालयात अंतिम टप्प्यात असलेल्या अनेक केसेसच्या निकालावर याचा परिणाम होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.