Pune: कोरोनाच्या संकटामुळे गणेशोत्सवात ढोल-ताशांचा दणदणाट नाही

Pune: Due to the crisis of corona, there is no sound of Dhol and tasha in Ganeshotsav पुणे शहरात 170 हून अधिक ढोल ताशा पथके आहेत. 25 हजारांहून अधिक सभासद आहेत.

एमपीसी न्यूज- पुणे शहरात कोरोनाचे अभूतपूर्व असे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे यंदा गणेशोत्सवात ढोल-ताशांचा दणदणाट जाणवणार नाही. पुण्यातील गणेशोत्सव हा जगप्रसिद्ध आहे. ढोल-ताशा तर पुण्याची शान आहे. साधारण 2-3 महिन्यांपूर्वीच ढोल-ताशांचा आवाज शहरातील कानाकोपऱ्यात घुमत असतो. यंदा एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाचा गणेशोत्सव साधाच होणार असल्याने ढोल-ताशांचा आवाज ऐकायला मिळणार नसल्याची माहिती पदाधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली आहे.

कोरोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आल्याने जास्त प्रमाणात रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे यंदा ढोल-ताशा पथकांच्या सरावाला सुरवात होणार असे वाटत नाही. प्रशासन, पोलीस व पुणे महापालिका जो निर्णय घेतील तो निर्णय मान्य करावा लागेल.

यंदा गणेशोत्सवात ढोल ताशा वाजणे अवघड असल्याचे ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर यांनी सांगितले. पुणे शहरात 170 हून अधिक ढोल ताशा पथके आहेत. 25 हजारांहून अधिक सभासद आहेत.

दरवर्षी विविध पथकात नवनवीन तरुण- तरुणाई सभासद म्हणून येत असतात. मात्र, यंदा या सर्व वादकांनी थांबावं आणि विचार करावा, असा सल्लाही ठाकूर यांनी दिला.

बँड वादकांचं जसं पोट वादनावर अवलंबून असतो. तसं ढोल ताशा पथकांचा नसतं. पथकांना जे मानधन दिल जातं. त्यात पथकांचा खर्च वजा करता पथके सामजिक काम वर्षभर करत असतात.

मागील सहा वर्षांत 6 ते 7 कोटीपर्यंत या पथकांना मानधन मिळाले आहे. गेल्या वर्षी मिळालेल्या मानधनातील उर्वरित रक्कम जी पथकांनी वादनासाठी ठेवली होती. ती त्यांनी या कोरोनाच्या महासंकटात लोकांना मदत करण्यासाठी वापरली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.