Pune : अवकाळी पावसामुळे शहरात 150 झाडे कोसळली; दुचाकीसह चारचाकी वाहनांचेही नुकसान

एमपीसी न्यूज – मागील दोन दिवसांत झालेल्या वादळी वारा आणि झालेल्या अवकाळी पावसामुळे पुणे शहरात 150 झाडे पडली. तर, 10 ते 12 दुचाकी, चारचाकी वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पोलीस स्टेशन, शिवजीनागर, पेठा, शहराच्या मध्यवर्ती भागांत ही झाडे पडली आहेत.

सध्या लोकडाऊन असल्याने सुदैवाने वाहतूककोंडी झाली नाही. किंवा कोणतीही जीवितहानी झाली नाही. झाडे पडल्याचे आणि वाहनांचे नुकसान झाल्याचे अग्निशमन विभागाला जवळपास 150 कॉल आले, अशी माहिती अग्निशमन दलाचे निलेश महाजन यांनी दिली.

पुणे शहरात सध्या कोरोनाचा हाहाकार माजला आहे. रोज 100 ते 125 रुग्ण आढळून येत आहेत. त्यात आणखी संकट म्हणजे अवकाळी पावसाने निर्माण केले आहे. रोज आकाशात ढग भरून येतात. विजांचा कडकडाट होतो. वादळी वाऱ्यासह पाऊस होत असल्याचे चित्र दुपारी 4 वाजता दिसून येते.

सकाळपासून दुपार पर्यंत मात्र कडक उन्हाळा जाणवतो. रात्री काही प्रमाणात पावसामुळे गारवा निर्माण होतो. असे विचित्र हवामान सध्या पुण्यात तयार झाले आहे. आणखी काही दिवस असाच अवकाळी पाऊस होणार असल्याचा इशारा हवामान खात्यातर्फे देण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.