Pune : महापालिकेतील 10 हजार कोटींच्या विविध टेंडरच्या चौकशीची विरोधकांची मागणी

राष्ट्रवादी - शिवसेना - काँग्रेसचे सर्वसाधारण सभेत आंदोलन

एमपीसी न्यूज – 24 बाय 7 समान पाणीपुरवठा योजना, एचसीएमटीआर, रिंग रोड, जायका नदी सुधार योजना, जलपर्णी, कात्रज – कोंढवा रोड, टेंडरमध्ये झालेल्या घोटाळ्यांची चौकशी झालीच पाहिजे या मागणीसाठी गुरुवारी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी – शिवसेना – काँगेसच्या नगरसेवकांनी आंदोलन केले.

सुमारे 10 हजार कोटी रुपये घोटाळा झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. भ्रष्ट अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांची चौकशी झालीच पाहिजे, अशी मागणीही यावेळी करून निषेध करण्यात आला. विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, जेष्ठ नगरसेवक आबा बागुल, नगरसेवक अविनाश बागवे, महेंद्र पठारे, नगरसेविका दीपाली धुमाळ, लक्ष्मी दुधाने या आंदोलनात सहभागी झाले होते.

एचसीएमटीआर, नदी सुधार जायका प्रकल्प सुरूच झाले नाही तर चौकशी कशाची करायची, असा सवाल स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे आणि माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी उपस्थित केला. यावेळी विरोधक घोषणाबाजी करीत असल्याने महापौर मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांना खाली बसण्याचे आवाहन केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.