Pune : पुण्यात भरतनाट्यमसह अफगाणी पारंपारिक नृत्याचाही रसीकांनी घेतला आनंद

एमपीसी न्यूज – पुण्यात (Pune) भरतनाट्यम व अफगाणी पारंपारिक नृत्य यांचे सुंदर सादरीकरण एकत्रित रित्या करण्यात आले. परराष्ट्र मंत्रालया अंतर्गत येणाऱ्या भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद पुणे विभाग आणि भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स यांच्या वतीने विशेष नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कोथरूड येथील भारती विद्यापीठाच्या न्यू लॉ कॉलेज सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ नृत्यांगना सुचिता भिडे-चापेकर, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टचे संचालक प्रा. शारंगधर साठे तसेच भरतनाट्यम नृत्यांगना अरुंधती पटवर्धन, पं. सुहास व्यास, महाविद्यालयाच्या नृत्य विभाग प्रमुख डॉ. देविका बोरठाकूर उपस्थित होते. अबासिन सफी, नजीब रासा, अस्लम निक्झाई, वारीस हेमत, अब्दुल सामी रासा निअझाई, बिलाल निअझाई, बहिर गुल बहिर यांनी अफगाणी पारंपारिक नृत्याचे सादरीकरण केले.

Javed Sheikh : जावेद शेख यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त रक्तदान स्पर्धा; राष्ट्रवादी चषक, रोख पारितोषिक

बंगळुरू येथील नृत्यकलाकार डॉ. शेषाद्री अय्यंगार आणि पुण्यातील (Pune) कथक नृत्यांगना ईशा नानल यांनी भरतनाट्यम आणि कथक नृत्यशैलीमधून भक्ती, मातृप्रेम, विरह या मानवी भावना उत्कटपणे सादर केल्या. भारताच्या सांस्कृतिक विविधतेतील समृद्ध परंपरा त्यांनी आपल्या सादरीकरणातून मांडली.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.