Kalapini : कलापिनी बालभवन येथे बालकांनी केले दीप पूजन

एमपीसी न्यूज – आषाढी अमावस्या म्हणजे दिव्याची अवस म्हणून साजरी केली जाते. सांप्रत काळात दुर्दैवाने या अमावस्येला वेगळे वळण लागत आहे. कलापिनी, स्वास्थ्य योग, कुमार भवन, महिला मंच यांनी एकत्रीतपणे तळेगाव येथील कलापिनी बालभवन येथे बालकांनी गुरुवारी (दि.28) दीप पूजन केले.

मागील वीस वर्षांपासून कलापिनी (Kalapini) बालभवनमध्ये दीप अमावस्या साजरी होते. सर्व मुलांना सर्व सण माहित व्हावे, त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावे यासाठी येथे सर्व सण साजरे होतात. यावेळी सर्व पालक उपस्थित होते.

Pune : पुण्यात भरतनाट्यमसह अफगाणी पारंपारिक नृत्याचाही रसीकांनी घेतला आनंद

कलापिनी बाल भवनतर्फे सर्व प्रकारच्या दिव्यांची सजावट करून मुलांनी दिव्याची महती सांगणारे एक गाणे सादर केले आणि कुमारभवनच्या मुलांनी दिव्यांचे वेगवेगळे प्रकार दाखवून त्याचे महत्त्व सांगितले. यावेळी मीरा कोन्नुर यांनी सुंदर गोष्टीतून दिव्याची महती सांगितली. शेवटी बालभवनच्या मुलांनी शुभंकरोती कल्याणम ही प्रार्थना म्हंटली. आणि कलापिनीच्या श्लोकाने कार्यक्रमाची सांगता झाली. सर्व पालकांनी आपल्या मुलांना (Kalapini) दिव्यांची ओळख करून दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.