Pune: भाऊ रंगारी गणपती जवळ देवरुखकर वाड्याला आग; सुदैवाने जीवित हानी नाही

एमपीसी न्यूज –  पुण्यातील बुधवार पेठ येथे भाऊ रंगारी गणपती जवळ (Pune)देवरूख वाड्याला आज (मंगळवारी) दुपारी दोनच्या सुमारास आग लागली होती. सुदैवाने यात जीवित हानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच 3 अग्निशमन गाड्या व 3 पाण्याचे टँकर 3 वॉटर टँकर (Pune)अशा 6 गाड्या घटनास्थळी दाखल झाली होती. घटनास्थळी दुमजली वाड्यात सध्या कोणी वास्तव्यास नव्हते. या जुन्या वाड्यात सध्या ट्रॉफी बनवण्याचे मोठ्या प्रमाणात साहित्य ठेवले आहे. या साहित्याने पेट घेतला असून मोठ्या प्रमाणात धूर झाला होता.

 

 दलाच्या जवळपास 10 अधिकारी व 40 जवानांनी आग इतरत्र पसरु न देता धोका टाळला. जखमी वा जिवितहानी नाही. आग नियंत्रणात असून कुलिंग करण्याचे काम सुरु आहे.

 

आगीचे कारण सद्यस्थितीत समजू शकले नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.