Pune : चंदूदादा परत जा, परत जा, म्हणत ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’कडून उमेदवारी अर्ज दाखल

एमपीसी न्यूज – ‘चंदूदादा परत जा, परत जा, आमचं ठरलंय, कमळ सोडलंय, भाडोत्री उमेदवार चालणार नाही’, आशा घोषणा देत रॅली काढून अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाकडून जिल्हाध्यक्ष मयुरेश अरगडे यांनी कोथरूड मतदारसंघातून अर्ज दाखल केला. त्यामुळे आता चंद्रकांत पाटील यांना निवडणूक जड जाणार असल्याची कोथरूडमध्ये चर्चा सुरू आहे.

_MPC_DIR_MPU_II

तसेच मनसेच्या किशोर शिंदे यांना राष्ट्रवादी, काँग्रेसने देखील पाठिंबा दर्शविला आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक जड जाणार, असे समजत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.