Pune : गुड न्यूज…आणखी दोन रुग्ण ‘कोरोना’मुक्तीच्या मार्गावर!

एमपीसी न्यूज – जगभर कोरोनाचे रुग्ण वाढत असताना पुणे शहरात आणखी दोन रुग्ण या आजारातून मुक्त होणार आहेत. यापूर्वी पाच रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आता बरे होणाऱ्यांची संख्या सात होणार आहे.

पुणे शहरातील खासगी रुग्णालयात उपचार घेणारी ४१ वर्षीय महिला आणि डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयात उपचार घेणाऱ्या एका रुग्णाची 14 दिवसांनंतरची पहिली टेस्ट निगेटिव्ह आली असून दुसऱ्या टेस्टचा रिपोर्ट लवकरच येत आहे.दुसरीही टेस्ट निगेटिव्ह येईल, अशी शक्यता महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.